पहिल्यांदा सरफराज खानची निवड न झाल्यामुळे कोण काय बोललाय? हे जाणून घेऊयात. "सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते का? मी फक्त विचारत आहे. या मुद्द्यावर गौतम गंभीरची भूमिका आम्हाला देखील माहिती आहे,असे काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली होती. त्यानंतर सपा खासदार झिया उर रहमान बरक यांनी या वादात उडी घेत म्हटले, "असे कधीच घडले नाही की एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे. प्रत्येक धर्म आणि जातीच्या लोकांनी नेहमीच देशासाठी खेळले आहे आणि त्याला सन्मान मिळवून दिला आहे." आपल्या मुस्लिम समुदायाने नेहमीच यामध्ये भूमिका बजावली आहे आणि सर्व धर्मांच्या लोकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
advertisement
जर एखाद्याची कामगिरी चांगली असेल तर त्याला केवळ धर्माच्या आधारावर काढून टाकणे हे आपल्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन ठरेल असे होऊ नये. जर असे झाले तर मी क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीचा सदस्य देखील आहे. मी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करेन,असे झिया उर रहमान बरक यांनी म्हटलं.
"सरफराज खानची इंडिया अ संघासाठी निवड का होत नाही? तो खूप चांगल्या सरासरीने खूप चांगली कामगिरी करत आहे. निवड समितीने त्याच्या निवडीसाठी कोणते निकष वापरले आहेत हे आम्हाला समजत नाही. सुरुवातीला त्याचे वजन जास्त असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु त्याने १७ किलो वजन कमी केले; आता तो तंदुरुस्त आहे. त्याचे नाव सरफराज आणि आडनाव खान असल्याने त्याची निवड होत नाही का?",असा सवाल एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी उपस्थित केला होता.
"हे लोक मुळात खोटे बोलणारे आहेत. ते विसरतात की मोहम्मद कैफ आमचे प्रतिनिधी होते. अब्दुल कादीर, वहाब किरमानी आणि मोहम्मद अझरुद्दीन हे सर्व आमचे कर्णधार होऊन गेले आहेत,अशी आठवण भाजप खासदार दिनेश शर्मा यावेळी करून दिली.
दरम्यान सरफराज खानवरून राजकारण पेटताना पाहून आता इरफान पठानने त्यात उडी घेतली आहे. निवड समितीडकडे आणि प्रशिक्षकाकडे (व्यवस्थापन) नेहमीच एक योजना असते. कधीकधी चाहत्यांच्या नजरेत ते चुकीचे वाटू शकते, परंतु कृपया गोष्टींना विकृत करू नका किंवा सत्याच्या जवळही नसलेले कथानक तयार करू नका,अशा कठोर शब्दात इरफान पठाणने प्रतिक्रिया देऊन राजकारण्यांना सुनावत त्यांची बोलती बंद केली आहे.