वीरेंद्र सेहवागशी तुलना पण...
जेव्हा शेफाली वर्माने भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं, तेव्हा तिच्या आक्रमक फलंदाजीची तुलना वीरेंद्र सेहवागशी केली जात होती. तिला लेडी सेहवाग अशी उपमा दिली जात होती. पहिल्या बॉलपासून जबरदस्त फटके मारण्यात सक्षम असलेल्या शेफालीने गोलंदाजांमध्ये भीती निर्माण केली, परंतु तिच्या आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनामुळे तिला संघातून वगळण्यात आलं. शेफालीला तिचा लय कायम ठेवता आला नाही आणि तिचा फॉर्म घसरला. शेफालीला चांगली सुरूवात मिळूनही मोठी खेळी करता आली नाही.
advertisement
वडिलांना हृदयविकाराचा झटका
2024 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होती. शेफालीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार होता. मात्र, बॅड न्यूज आली. शेफालीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलं. शफालीसाठी हा काळ सोपा नव्हता, कारण तिच्या वडिलांना संघातून वगळण्याच्या फक्त दोन दिवस आधी हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, शेफालीने हे तिच्या वडिलांपासून लवपून ठेवलं आणि एका आठवड्यानंतर त्यांना सांगितलं की ती संघातून ड्रॉप झाली आहे. वडिलांना झालेला त्रास पाहून शेफाली खचून गेली.
वर्ल्ड कप स्कॉडमधून डच्चू
शेफालीला संघातून वगळण्यात आल्याने आणि नंतर तिच्या वडिलांच्या हृदयविकाराने शफालीला खूप त्रास झाला, परंतु तिने हार मानली नाही आणि स्थानिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी कठोर परिश्रम केलं. तिने केवळ तिचा फॉर्म परत मिळवला नाही तर तिची फिटनेस देखील सुधारली. शेफालीने तिचं वजन कमी केलं. परंतू तरीही पदरी निराशा आली. शेफालीला वर्ल्ड कप स्कॉडमध्ये टीम इंडियात संधी मिळाली नाही. एवढंच काय तर रिझर्व स्कॉडमध्ये देखील शेफालीला संधी मिळाली नाही.
शेफालीला बीसीसीआयकडून फोन
आता आपलं करियर संपलं असं तिला वाटू लागलं. पण चमत्कार घडला. शेफालीला बीसीसीआयकडून फोन आला अन् थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळाली. प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्याने शेफालीला बॅग पॅक करण्याची ऑर्डर मिळाली. शेफाली थेट नवी मुंबईत पोहोचली ती सेमीफायनल खेळण्यासाठीच... शेफाली वर्माने सेमीफायनलमपध्ये पुन्हा माती खाल्ली. त्यामुळे फायनलमध्ये तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवतील की नाही? असा सवाल होता. शेफालीने फायनलमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली अन् वर्ल्ड कप आपल्या ऑलराऊंडर कामगिरीने जिंकवून दिला.
