शेफालीला सेमीफायनलपूर्वी संघात स्थान
वुमेन्स वर्ल्ड कप फायनलमध्ये आपल्या उत्कृष्ट ऑलराऊंड परफॉर्मन्सने वाहवा मिळवणाऱ्या शेफाली वर्माला मोठं बक्षीस मिळालं आहे. दुखापतग्रस्त प्रतिका रावळच्या जागी शेफालीला सेमीफायनलपूर्वी संघात स्थान देण्यात आलं होतं. अशातच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये सुरू होत असलेल्या सिनियर इंटरझोनल टी-20 ट्रॉफीसाठी तिची नॉर्थ झोनची कॅप्टन म्हणून निवड झाली आहे.
advertisement
शेफाली वर्माला थेट कॅप्टन केलं
नागालँडमध्ये 4 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या सिनियर वुमेन्स इंटरझोनल टी20 ट्रॉफीमध्ये एकूण 6 टीम सहभागी होणार आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) प्रादेशिक निवड समित्यांनी आपापल्या टीमची निवड केली आहे. यामध्ये शेफाली वर्माला थेट कॅप्टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सेंट्रल झोनची कॅप्टन नुजहत परवीन असेल. मीता पॉलकडे ईस्ट झोनची जबाबदारी आहे. तर अनुजा पाटिल वेस्ट झोन सांभाळेल.
संधीचा पुरेपूर फायदा घेतला
दरम्यान, प्रतिका रावळच्या जागी शेफालीला थेट सेमीफायनलपूर्वी संघात सामील करण्यात आले होते. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 5 बॉलमध्ये 10 रन केले होते, पण फायनलमध्ये मिळालेल्या संधीचा तिने पुरेपूर फायदा घेतला आणि टीम इंडियाला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या शानदार कामगिरीमुळेच तिला नॉर्थ झोनच्या कॅप्टनपदी बढती मिळाली आहे.
