रिंकू, लग्न कधी आहे?
काल बॉलिवूडचा किंग खान याचा 60 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अनेक क्रिकेटर्सने तसेच बॉलिवूड सेलिब्रेटींनी किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाहरूख खानचा लाडका खेळाडू रिंकु सिंग याने देखील ट्विटरवरून शाहरूख खान याला सहा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. बेस्ट एवर हॅप्पी बर्थडे, असं रिंकुने पोस्टमध्ये म्हटलं. त्याला शाहरूख खानने शुभेच्छा दिल्या. थँक्यू रिंकु सिंग... खूप खूप प्रेम... आणि लग्न कधी आहे? असा सवाल शाहरूख खानने विचारला.
advertisement
प्रिया सरोजशी साखरपुडा
रिंकूने या वर्षी 8 जून रोजी लखनऊमध्ये प्रिया सरोजशी साखरपुडा उरकला. तथापि, लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. प्रिया एक राजकारणी आहे आणि उत्तर प्रदेशातील मच्छली शहर येथून खासदार आहे. रिंकू सिंगशी लग्न झाल्यापासून प्रिया सरोजचे लग्न खूप चर्चेचा विषय ठरले आहे. रिंकू सिंगच्या लग्नाच्या तारखेच्या अनेक बातम्या समोर येत असल्याने किंग खान देखील गोंधळल्याचं पहायला मिळालं. किंग खान याने रिंकूला एक वचन दिलंय, त्यासाठी किंग खानने हा प्रश्न विचारल्याचं पहायला मिळतंय.
लग्नात नाचण्याचे आश्वासन
दरम्यान, रिंकूने एका मुलाखतीत खुलासा केला की, शाहरुख खानने तिला फोनवरून सांगितले होते की तो तिच्या लग्नात नक्कीच उपस्थित राहील आणि नाचेल. शाहरुख खानने तिच्या लग्नात नाचण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणूनच किंग खानने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रिंकूला तिच्या लग्नाबद्दल विचारलं, असा अंदाज बांधला जातोय.
