मी नेहमीच म्हणतोय की... - शाहिद आफ्रिदी
मी नेहमीच म्हणतोय की, राजकारणात काहीही असलं तरी देखील क्रिकेट सुरू राहिले पाहिजे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध चांगले होण्यास नेहमीच मदत झाली आहे. इंग्लंडमध्ये लोकांनी वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी तिकिटं खरेदी केली होती आणि खेळाडूंनी सराव केला होता. मग तुम्ही खेळला नाही. काय विचार होता? मला समजत नाही, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने नाकपुड्या फुगवल्या आहेत.
advertisement
युवराज सिंगने सांगितलं होतं... - शाहिद आफ्रिदी
एका भारतीय खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने ती मॅच रद्द झाली होती, असाही दावा शाहिद आफ्रिदी याने केला. या खेळाडूला आफ्रिदीने 'सडका अंडा' (rotten egg) असं म्हटलं आहे. आफ्रिदीच्या मते, त्या खेळाडूच्या कॅप्टनने (युवराज सिंगने) त्याला सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नकोस, असं सांगितलं होतं, पण पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमधून तो बाहेर पडू शकतो, असंही सांगितलं होतं. पण त्याने ऐकलं नाही. अफ्रिदीने दावा केलेला हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून शिखर धवन होता.
पाकिस्तान खोड्या काढतंय का?
दरम्यान, शाहिद अफ्रिदीचं वादग्रस्त विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपची मॅच 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. अशातच आता पाकिस्तानी खेळाडू भारताशी पंगा घेण्यासाठी खोड्या काढतंय का? असा सवाल विचारला जात आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.