शाहरुख खानसोबत मैदानावर मुलगी सुहाना आणि मुलगा अबरामसुद्धा दिसत आहेत. शाहरुख खान जेव्हा सीएसके सीएसके अशा घोषणा देतो तेव्हा सुहाना, गौरी खान आणि अबराम हे हसताना दिसतात. सोशल मीडीयावर शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
advertisement
केकेआर जिंकल्यानंतर शाहरुखनच्या त्याची सिग्नेचर पोझ देत आनंद व्यक्त केला, पत्नी गौरी खान, लेक सुहाना, अब्राहम आणि आर्यन खान हे देखील स्टेडिअमवर उपस्थित होते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, शाहरुखनं आनंदाच्या भरात लेक सुहानाला मिठी मारली. सुहाना देखील यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर शाहरुखनं आनंदाच्या भरात पत्नी गौरी खानला सर्वांसमोर किस देखील केलं.
यंदाच्या आयपीएल हंगामात केकेआरची कामगिरी जबरदस्त अशी होती. २०१४ मध्ये केकेआरने गंभीरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर यावेळी गौतम गंभीर मेंटॉरच्या भूमिकेत होता. त्याने केकेआरच्या संघाचं वातावरणच बदलूतन टाकलं. परिणामी संघाने कमाल करत आधी लीग फेरीत अव्वल राहिले, त्यानंतर थेट अंतिम फेरी गाठून दणदणीत विजय मिळवला.