शाई होप डोळ्यांच्या समस्येने त्रस्त
शाई होप याने जस्टिन ग्रीव्हजसोबत 140 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे 521 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात चार गडी बाद 212 धावा करून आपल्या आशा जिवंत ठेवल्या. शाई होप डोळ्यांच्या समस्येने त्रस्त होता.
advertisement
15 फोर आणि एक सिक्स
शाई होप याच्या डोळ्यांचा संसर्ग झाला होता. अजूनही तो यातून बरा झाला नाहीये. पाचव्या दिवशी देखील शाई होप मैदानात बॅटिंग करताना दिसणार आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा होप 116 धावांसह क्रीजवर उभा होता. त्याने आतापर्यंत 183 बॉलचा सामना केला आहे आणि 15 फोर आणि एक सिक्स मारला.
319 धावांनी पिछाडीवर
न्यूझीलंडने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज संघाने चौथ्या दिवशी झुंज दिली असली तरी, त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. मॅचच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने 72 धावांत 4 विकेट्स गमावून त्यांची निराशाजनक सुरुवात केली होती. ही स्थिती पाहता, वेस्ट इंडिजसाठी हा एक मोठा चॅलेंज आहे यात शंका नाही. अजूनही वेस्ट इंडिजला न्यूझीलंडच्या आघाडीपेक्षा 319 धावांनी पिछाडीवर राहावं लागलं.
