रोहित शर्माला कॅप्टन्सी सोपवली पाहिजे...
जर टीम इंडियाला 2027 चा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर बीसीसीआयने तातडीने हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर यांना काढून टाकलं पाहिजे आणि रोहित शर्मा याला पूर्ण कॅप्टन्सी सोपवली पाहिजे, असं सिद्धूचं स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. अशातच सिद्धू यांनी हे विधान आपण केलं नसल्याचं म्हटलं आहे. या फेक स्टेटमेंटवर अनेक कमेंट्स आल्या होत्या.
advertisement
तुम्हाला लाज वाटली पाहिजे.... - नवज्योत सिंग सिद्धू
नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण असं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, " मी कधीच असं म्हटलं नाही. खोट्या बातम्या पसरवू नका , मला कधीच वाटलं नव्हतं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. " सिद्धू यांची पोस्ट आता व्हायरल होत आहे.
टेलिव्हिजनच्या जगातला हास्याचा आवाज
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरचा उत्साह, राजकारणाच्या रस्त्यांवरचा संघर्ष आणि टेलिव्हिजनच्या जगातला हास्याचा आवाज. नवज्योत सिंग सिद्धू यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिद्धू समालोचनाकडे वळले. त्यांच्या उत्साही, अस्खलित आणि मनोरंजक समालोचन शैलीमुळे त्यांना "सिक्सर सिद्धू" आणि "सरदार ऑफ द कॉमेंट्री बॉक्स" असं टोपणनाव मिळालं आहे.