पाकिस्तानच्या टीमने 200 रन्स केले असते तरी...
मॅच संपल्यावर एका टीव्ही शोमध्ये शोएब अख्तर म्हणाला, जर फहीमकडून बॉलिंग करून घ्यायचीच होती तर त्याने नवीन बॉलने सुरुवात करायला हवी होती. त्याला सॅमच्या जागी आणले असते तर कदाचित फायदा झाला असता. तुमचा मुख्य बॉलर अबरार असताना तुम्ही पार्ट टाईम बॉलर सॅम अय्युबला आधी बॉलिंग दिली. तुमची बॉलिंग लाईन-अप या लायकीची नव्हतीच. जर पाकिस्तानच्या टीमने 200 रन्स केले असते तरी हे बॉलर्स ते रन्स वाचवू शकले नसते, असं शोएब अख्तर म्हणाला.
advertisement
सूर्यकुमार आऊट झाला नसता तर...
शोएब अख्तर पुढे म्हणाला, "पाकिस्तानच्या बॉलिंगमध्ये काहीच विशेष वाटलं नाही. हारिस रऊफनेही भारताविरुद्ध एकाही बॅटरला बाद केलं नाही. भारतीय बॅटर्स स्वतःच्या चुकीमुळेच आउट झाले. सूर्यकुमार यादवने चुकीचा शॉट मारला आणि त्यामुळे विकेट मिळाली. नाहीतर ही मॅच इतकी पुढे गेलीच नसती, असंही अख्तर म्हणाला.
केएल राहुल टीममध्ये हवा होता
अख्तरने भारतीय टीमचेही कौतुक केले. तो म्हणाला, विचार करा, या टीममध्ये केएल राहुल नाही. तो तर बॉलर्सला मारून मारून काढतो. संजू सॅमसनच्या जागी केएल राहुल टीममध्ये असायला हवा होता. टीम इंडियाचा कमजोर दुवा संजू सॅमसन होता, म्हणूनच ही मॅच 19 व्या ओव्हरपर्यंत गेली. जर अभिषेक शर्मा मैदानात थोडा वेळ थांबला असता, तर त्याने मॅच कधीच संपवली असती. तो आउट झाल्यामुळेच मॅच इतकी पुढे गेली. अभिषेक शर्मा बाद झाला नसता तर त्याने पाच ओव्हर्स आधीच मॅच संपवली असती, असंही शोएब अख्तर म्हणाला आहे.