सहा महिन्यांचा ब्रेकची विनंती
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, श्रेयस अय्यरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) त्याच्या पाठीच्या आजारामुळे रेड-बॉल क्रिकेटमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेण्याची औपचारिक विनंती केली. बीसीसीआयने त्याची ही विनंती मान्य देखील केली होती. मात्र, श्रेयस अय्यरने असा निर्णय का घेतला? यावर श्रेयसने पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
माझी एनर्जी लेवल कमी होत होती
advertisement
जेव्हा मी रेड-बॉल क्रिकेटमध्ये परतलो (चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल नंतर), तेव्हा मला असे जाणवलं की काही ओव्हरपेक्षा जास्त फिल्डिंग केल्यानंतर माझी एनर्जी लेवल कमी होत होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी, तुम्हाला ती तीव्रता कायम ठेवावी लागते. आणि मला असं वाटलं की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असलेल्या तीव्रतेशी जुळवून घेऊ शकत नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला आणि निवडकर्त्यांना कळवलं होतं, असं श्रेयस अय्यर याने म्हटलं आहे.
दुसऱ्या दिवशी विश्रांतीचा दिवस
एकदिवसीय क्रिकेटमध्ये, तुम्हाला माहिती आहे की एक दिवस फिल्डिंग केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी विश्रांतीचा दिवस असतो, जेणेकरून तुम्ही आरामात बरे होऊ शकता. तो वेळ तुम्हाला कसोटीमध्ये मिळत नाही, असंही श्रेयसने म्हटलं आहे.
परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो
मुंबईतही जेव्हा आपण अतिरिक्त उसळी असलेल्या लाल मातीच्या पीचवर खेळतो तेव्हा सरळ भूमिका मदत करते. प्रत्येक पीच वेगळी असल्याने तुम्हाला सतत जुळवून घ्यावे लागते. मी आतापर्यंत अनेक वेळा माझं पीच बदलेलं आहे आणि मला वाटतं की मी सध्या कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो, असंही श्रेयस अय्यर म्हणाला आहे.
दुसऱ्या सामन्यातील पराभव वेदनादायी
दरम्यान, श्रेयसने दुसऱ्या सामन्यातील पराभवावर देखील भाष्य केलं. अशा प्रकारे पराभव होणे निश्चितच वेदनादायी आहे. मला वाटते की पहिला सामना तितकासा विश्वासार्ह नव्हता कारण पावसाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. पण या सामन्यात येताना, आमच्यासाठी निश्चितच करा किंवा मरो असा खेळ होता, असं श्रेयस म्हणाला.
