काय म्हणाला शुभमन गिल?
शुभमन गिलच्या मते, मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स न मिळाल्याने टीमला मोठा फटका बसला. 30 यार्डच्या सर्कलमध्ये 5 फिल्डर्स असताना जर तुम्ही विकेट्स घेतल्या नाहीत, तर धावसंख्या रोखणे कठीण होते. आपण 15 ते 20 रन्स अधिक केले असते, तरीही विकेट्सशिवाय टार्गेट वाचवणं कठीण गेलं असतं, असं परखड मत शुभमन गिलने मांडलं आहे.
advertisement
मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं
बॅटिंगबद्दल बोलताना शुभमनने सांगितलं की, अशा खेळपट्टीवर मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं असतं. सेट झालेल्या बॅट्समनने मोठी खेळी करणं आवश्यक आहे, कारण नवीन येणाऱ्या खेळाडूसाठी लगेच फटकेबाजी करणं सोपं नसतं. भारताने पहिल्या 10 ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग केली आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला, मात्र समोरच्या टीमने मधल्या ओव्हर्समध्ये संयमी बॅटिंग करत मॅच आपल्या बाजूने झुकवली.
कॅच सोडणं महागात पडलं - शुभमन गिल
दरम्यान, पिचच्या परिस्थितीवर भाष्य करताना तो म्हणाला की, सुरुवातीच्या 15 ओव्हर्समध्ये बॉल चांगला हालचाल करत होता, मात्र 25 ओव्हर्सनंतर पिच थोडे शांत झाले. अशा वेळी बॉलिंग करताना अधिक धाडसी निर्णय घेण्याची आणि चान्स घेण्याची गरज होती. फिल्डिंगमधील चुकांवरही त्याने नाराजी व्यक्त केली. कॅच सोडणं महागात पडलं असून, फिल्डिंग हा असा विभाग आहे, जिथं टीमला अजून खूप सुधारणा करण्याची गरज असल्याचं शुभमन गिलने मान्य केलं.
