अखेर तिसऱ्या टी-20 सामन्यातून संजू सॅमसनला टीमबाहेर केलं गेलं, पण गिलला मात्र अजूनही सूर गवसलेला नाही. मागच्या 10 इनिंगमध्ये गिलचा स्कोअर 20*, 10, 5, 47, 29, 4, 12, 37*, 5 आणि 15 एवढा आहे. एवढच नाही तर जुलै 2024 पासून गिलला टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये अर्धशतकही करता आलेलं नाही.
जयस्वालचं गंभीरला उत्तर
advertisement
शुभमन गिलला वारंवार संधी मिळत असताना संजूला बेंचवर बसावं लागत आहे, तर यशस्वी जयस्वालची भारताच्या टी-20 टीममध्ये निवडही होत नाहीये, पण जयस्वालने त्याच्या बॅटनेच उत्तर दिलं आहे. राजस्थानविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात जयस्वालने दुसऱ्या इनिंगमध्ये 156 रन केले. 174 बॉलमध्ये केलेल्या या खेळीमध्ये जयस्वालने 18 फोर आणि एक सिक्स लगावली. जयस्वालच्या या खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईला हा सामना ड्रॉ करण्यात यश आलं. याआधी पहिल्या इनिंगमध्येही जयस्वालने 67 रन केले होते.
