खरं तर शुभमन गिलला वनडेचा नवा कर्णधार बनवताच बीसीसीआयने एक व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओमध्ये गिलचा या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी कर्णधारपदापासून ते व्हाईट बॉल कर्णधार म्हणून त्याच्या नवीन भूमिकेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
हा व्हिडिओ 24 मे 2025 च्या फ्लॅशबॅकने सुरू झाला, जेव्हा गिलला भारताचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.त्यावेळेस शुभमन गिल म्हणाला, हे निश्चितच थोडे जबरदस्त आहे.लहानपणी,जेव्हा कोणीही क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, तेव्हा ते भारतासाठी खेळू इच्छितात आणि फक्त भारतासाठी खेळू इच्छित नाहीत तर बराच काळ कसोटी क्रिकेट खेळू इच्छितात.ही संधी मिळणे हा एक मोठा सन्मान आहे.ही एक मोठी जबाबदारी असल्याचे शुभमन गिल सांगतो.
दरम्यान आज 4 ऑक्टोबर 2025 रोजी गिलला भारताचा एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आल्यावर त्याने अहमदाबादशी असलेल्या त्याच्या भावनिक संबंधाची कबुली दिली.''शब्दात सांगणे कठीण आहे, हे राज्य माझ्यासाठी खूप खास आहे.माझ्या आयपीएल संघाचे नेतृत्व करण्यापासून ते कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त होण्यापर्यंत आणि मायदेशात माझ्या पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व करण्यापर्यंत हे सर्व येथे घडले. हे ठिकाण माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहिले आहे.'',असे गिल सांगतो.
वनडे फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे.एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व करणे आणि इतके चांगले कामगिरी करणाऱ्या संघाचे नेतृत्व करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. माझ्यासाठी हा खूप अभिमान आहे आणि मला आशा आहे की मी उत्तम कामगिरी करू शकेन,असेही शुभमन गिल म्हणाला आहे.
शुभमन गिलने यावेळी दक्षिण आफ्रिकेत पार पडणाऱ्या 2027 च्या वर्ल्डकपवरही भाष्य केले. मला वाटते की वर्ल्डकप खेळण्यापूर्वी आपल्याकडे 20 एकदिवसीय सामने आहेत. अंतिम ध्येय दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप आहे.त्यामुळे हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे शुभमन गिलने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन