रात्री उशिरा डिस्चार्ज मिळाला
स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती स्थिर झाल्याने दोन दिवसानंतर काल त्यांना रात्री उशिरा डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डिस्चार्ज मिळाल्याने स्मृतीच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे पलाशला देखील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो मुंबईला रवाना झाला आहे.
advertisement
पलाशच्या आईने काय सांगितलं?
पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या फार जवळचा आहे. कदाचित तो स्मृतीपेक्षा जास्त तिच्या वडिलांना मानतो. त्यामुळे पलाशने आत्ताच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. स्मृतीपेक्षा जास्त पलाश त्यांच्यासाठी जवळचा आहे. जेव्हा श्रीनिवास यांची तब्येत बिघडली, तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत अंकल बरे होत नाहीत, तोपर्यंत लग्न नाही, असं पलाशने सर्वांना सांगितलं होतं.
श्रीनिवास मानधना कोण?
स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मानधना हे स्वतः एक क्रिकेटर होते. त्यांनी जिल्हा पातळीवर सांगलीचे प्रतिनिधित्व केले होते, एकदिवस भारतासाठी खेळावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु कौटुंबिक पाठिंब्याचा अभाव आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना आपलं क्रिकेट करिअर अर्धवट सोडावं लागलं. पण श्रीनिवास मंधाना यांनी आपल्या मुलांना क्रिकेटर बनण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी मुलगी स्मृती आणि मुलगा श्रवण मंधाना याला क्रिकेटर बनवलं.
