हटके पद्धतीने साखरपुड्याची घोषणा
स्मृती मंधानाने साखरपुड्याची घोषणा एकदम हटके पद्धतीने केली असून मानधानाने इंस्टाग्रामवर रील शेअर केली आहे, त्यामध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी या भारतीय क्रिकेटपटू देखील पाहायला मिळत आहेत. यामध्ये महिला खेळाडू नाचत असल्याचं पहायला मिळतंय. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातील समजो हो ही गया... या गाण्यावर डान्स करत स्मृतीने आपली एन्गेजमेंट रिंग दाखवली.
advertisement
23 नोव्हेंबरला लग्नाच्या बेड्यात
स्मृतीच्या घोषणेनंतर आता दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तिच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं पहायला मिळतंय. आता स्मृती आणि पलाश येत्या 23 नोव्हेंबरला लग्नाच्या बेड्यात अडकणार असल्याची माहिती आहे. पलाशने स्मृतीला स्टेडियममध्ये प्रपोज केल्याचे समोर आले होते. यावेळी स्मृतीच्या बोटात रिंगही दिसली होती. आता नवरदेवाचं वऱ्हाड सांगलीत पोहोचलं आहे.
काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये
दरम्यान, स्मृती आणि पलाश गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्या अफेअरची बातमी लीक झाल्यानंतर दोघांनी गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांबरोबर फोटो शेअर करण्यास सुरूवात केली. आपलं नातं त्यांनी जगजाहीर केलं होतं. अशातच आता दोघांनी एकमेकांच्या आयुष्याचा साथीदार व्हायचं ठरवलेलं आहे.
