TRENDING:

The Hundred : स्मृती मानधनावर डॉलर्सचा पाऊस, पाकिस्तानी खेळाडूंना रुपयाही मिळाला नाही! जगातील नंबर 1 टी-20 बॉलरची बेज्जती

Last Updated:

No bid for Pakistan Women cricketers in Hundred 2026 auction : पाकिस्तानच्या एकाही महिला खेळाडूला खरेदीदार मिळाला नाही. यामध्ये कॅप्टन फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता, ज्यांना अनसोल्ड राहावं लागलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Hundred Women 2026 auction : क्रिकेटचा नवा फॉरमॅट असलेल्या द हंड्रेड (The Hundred) स्पर्धेच्या ऑक्शनमध्ये स्टार खेळाडूंवर पैशांचा नाही तर डॉलर्सचा पाऊस पडल्याचं पहायला मिळालं आहे. ऑक्शनसाठी ड्राफ्टमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. बुधवारी 11 मार्च रोजी झालेल्या या लिलावात पाकिस्तानच्या एकाही महिला खेळाडूला खरेदीदार मिळाला नाही. यामध्ये कॅप्टन फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता, ज्यांना अनसोल्ड राहावं लागलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानची पुन्हा बेज्जती झाल्याचं पहायला मिळालंय.
No bid for Pakistan Women cricketers in Hundred 2026 auction
No bid for Pakistan Women cricketers in Hundred 2026 auction
advertisement

नंबर 1 टी-20 बॉलरला रुपयाही नाही

विशेष म्हणजे, फातिमा सना आणि सध्याची नंबर 1 टी-20 बॉलर सादिया इक्बाल यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं. लिलावाच्या अंतिम टप्प्यात त्यांचे नाव समोर आलं, परंतु एकाही फ्रँचायझीने त्यांच्यावर बोली लावली नाही. इतर दोन खेळाडू, मुनीबा अली आणि डायना बेग यांना तर शॉर्टलिस्टमध्येही स्थान मिळवता आलं नाही. या लिलावासाठी फातिमा सना, सादिया इक्बाल, मुनीबा अली आणि डायना बेग यांनी नोंदणी केली होती. या सर्वांची बेस प्राईस 15,000 पाउंड इतकी होती. मात्र, लिलावाच्या रिंगणात या खेळाडूंना घेण्यास कोणत्याही संघाने रस दाखवला नाही, ज्यामुळे पाकिस्तानच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले आहे.

advertisement

स्मृती मानधनाला 50 हजार पाऊंड

मँचेस्टर सुपर जायंट्सने यापूर्वी स्मृती मानधनासोबत ऑस्ट्रेलियन दिग्गज मेग लॅनिंगला थेट करार करून, तर इंग्लंडची स्पिनर सोफी एक्लेस्टोनला कायम ठेवून आपला संघ मजबूत केला होता. मँचेस्टर सुपर जायंट्सने स्मृती मानधनाला 50 हजार पाऊंड (जवळपास 61 लाख रुपये) इतक्या किमतीत खरेदी केलं. तर टीम इंडियाची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्मा हिला सनरायझर्स लीड्सने 27,500 पाऊंड (अंदाजे 34 लाख रुपये) मध्ये विकत घेतलं.

advertisement

'द हंड्रेड'मध्ये स्मृती मानधनाची एन्ट्री, 50 हजार पाऊंडची बोली, टीम इंडियाच्या पोरीही मालामाल!

8,80,000 पाऊंडचे बजेट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

दरम्यान, टीम इंडियाची ऑलराऊंडर असलेल्या दीप्ती शर्मासाठी दुसऱ्या कोणत्याही टीमने बोली लावली नाही, तर यास्तिका भाटिया आणि श्री चरणी यांना निराश व्हावं लागलं, कारण त्यांना कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही. प्रत्येक महिला फ्रँचायझीकडे त्यांची टीम तयार करण्यासाठी 8,80,000 पाऊंडचे बजेट होते. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंवर बोली लागली नाही. तर पाकिस्तानी खेळाडूंकडे पाहिलं देखील गेलं नाही.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
The Hundred : स्मृती मानधनावर डॉलर्सचा पाऊस, पाकिस्तानी खेळाडूंना रुपयाही मिळाला नाही! जगातील नंबर 1 टी-20 बॉलरची बेज्जती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल