थेट वर्ल्ड कप सेलिब्रेशनवेळी मैदानात
दोन्ही प्लेअर्सनी टीम इंडियाला मजबूत स्टार्ट देऊन वर्ल्ड कप विजयाचा पाया रचला. स्मृती मंधाना ही संपूर्ण टूर्नामेंटमध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठी बॅटर ठरली, तर प्रतिका रावलची आक्रमक कामगिरी मोक्याच्या वेळी टीमसाठी खूप उपयुक्त ठरली, मात्र दुखापतीमुळे तिची टूर्नामेंट अपूर्ण राहिली होती. त्यानंतर ती थेट वर्ल्ड कप सेलिब्रेशनवेळी मैदानात दिसली. तिथं स्मृतीने तिची साथ सोडली नाही. स्मृतीने प्रतिकाला विलचेअरसह स्टेजवर नेलं. त्यावेळी प्रतिकाने हिटमॅन रोहित शर्माचं देखील लक्ष वेधून घेतलं.
advertisement
स्मृती मानधनाची कामगिरी
टीम इंडियाची उपकर्णधार आणि अनुभवी ओपनर स्मृती मानधना हिने संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत जबरदस्त सातत्य राखलं. तिने 9 मॅचेसमध्ये 54.25 च्या एव्हरेजने एकूण 434 रन्स केल्या आणि वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा मिताली राजचा भारतीय रेकॉर्ड मोडला. तिच्या परर्फॉर्मन्समध्ये 1 सेंच्युरी आणि 4 फिफ्टींचा समावेश आहे. तिने प्रतिका रावलसोबत अनेक महत्त्वाच्या पार्टनरशिप्स केल्या. विशेषतः न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तिने 95 बॉलमध्ये 109 धावांची शानदार सेंच्युरी ठोकली, ज्यामुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम मॅचमध्येही तिने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
प्रतिका रावल छाप सोडली
युवा ओपनर प्रतिका रावल हिनेही वर्ल्ड कपमध्ये आक्रमक फलंदाजी करत आपली छाप सोडली. लीग मॅचेसमध्ये ती स्मृती मंधानानंतर टीम इंडियाची दुसरी सर्वात जास्त रन्स करणारी प्लेअर होती. 6 मॅचेसमध्ये तिने 51.33 च्या एव्हरेजने एकूण 308 रन्स केल्या, ज्यात 1 सेंच्युरी आणि 2 फिफ्टींचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये तिने 134 बॉलमध्ये 122 धावांची अविस्मरणीय सेंच्युरी केली. या मॅचमध्ये स्मृती आणि प्रतिका यांनी 212 धावांची रेकॉर्डब्रेक ओपनिंग पार्टनरशिप केली, जी वर्ल्ड कपच्या इतिहासातील टीम इंडियाची सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली.
दुखापतीमुळे सेमीफायनलमधून बाहेर
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये तिला दुखापत झाल्यामुळे ती सेमीफायनल आणि फायनलमधून बाहेर झाली, ज्यामुळे शफाली वर्माला संधी मिळाली. प्रतिका रावलला टीम इंडियामधून बाहेर जावं लागलं. पण तिथं देखील तिने टीम इंडियाची साथ सोडली नाही. प्रतिका वेळोवेळी टीम इंडियाला मानसिकदृष्ट्या सपोर्ट करत होती.
