स्मृती 88 धावा करून आऊट झाली अन्...
289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने तिसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. स्मृतीच्या बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र बदलले आणि इंग्लंडने सामना जिंकला. 42 व्या ओव्हरमध्ये स्मृती 88 धावा करून आऊट झाली. गोलंदाज लिन्सी स्मिथला मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना स्मृती मानधना बाद झाली.
advertisement
मी स्वत:ला जबाबदार धरते...
शेवटच्या 52 बॉलमध्ये फक्त 55 धावा हव्या असतानाही भारत लक्ष्य गाठू शकला नाही. मानधना म्हणाली की, धावांच्या बाबतीत माझी शॉट निवड अधिक चांगली असू शकली असती. विशेषतः कारण ते माझ्यापासून सुरू झालं होतं. त्यासाठी मी स्वत:ला जबाबदार धरते. माझी शॉट सिलेक्शन चांगली असायला हवी होती. कदाचित आम्ही खेळ अधिक खोलवर नेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, असंही स्मृती मानधना म्हणाली आहे.
पुढचा सामना आमच्यासाठी क्वार्टर फायनल
आम्ही अजून बसून त्यावर अद्याप चर्चा केलेली नाही. पण क्रिकेटमध्ये काहीही सोपे नसते. अर्थात, पुढचा सामना पहिल्या चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी व्हर्च्युअल क्वार्टर फायनल असेल. पण हो, तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी सोपा दिवस नकोय, असंही स्मृती मानधना म्हणाली आहे.
इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश
दरम्यान, भारताला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आणि न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध त्यांचे उर्वरित सामने शिल्लक असताना ते पाईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला.