पलाशने स्मृतीला घट्ट मिठी मारली अन्...
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदाना लवकरच संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोघंही लग्न करतील, अशी चर्चा आहे. अशातच वर्ल्ड कप फायनलवेळी पलाश मुच्छल स्टेडियमवर उपस्थित होता. होणाऱ्या बायकोचा सामना पाहण्यासाठी पलाश डी.वाय पाटील स्टेडियमवर होता. अशातच मॅचनंतर पलाशने स्मृतीला घट्ट मिठी मारली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण यावेळी स्मृतीने असं काही केलं की, अनेकांना तिचा अभिमान वाटला.
advertisement
स्मृतीने पलाशची चूक लगेच सुधारली
स्मृती मानधनाने पलाशला पाहताच मिठी मारली. त्यावेळी तिचा आनंद गगनात मावेना झाला होता. पलाशने त्याच्या खांद्यावर असलेला तिरंगा स्मृतीच्या खांद्यावर दिला. मात्र, तो तिरंगा उलटा ठेवला गेला. स्मृतीने होणाऱ्या नवऱ्याची चूक लगेच सुधारली अन् पलाशला खडसावलं. स्मृतीने तिरंगा त्याला सगळ ठेवायला लावला. स्मृतीने तिरंगा अभिमानाने खांद्यावर घेऊन मिरवला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे.
पाहा Video
देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील महिला खेळाडूंचा सत्कार आणि त्यांना रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. यामध्ये स्मृती मानधना, राधा यादव आणि जेमिमा रॉड्रिक्स यांचा समावेश आहे.
