शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक सामना
श्रीलंका आणि बांगलादेश महिला टीम्समध्ये झालेला वनडे सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरला. 12 बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना बांगलादेशच्या महिला टीमने हा सामना गमावला. 45 ओव्हर्समध्ये 176/3 अशा भक्कम स्थितीमध्ये असलेल्या बांगलादेश टीमचा डाव कर्णधार चामरी अथापथु आणि दासनायका यांच्या भेदक बॉलिंगमुळे 50 ओव्हर्समध्ये 195/9 पर्यंत मर्यादित राहिला.
advertisement
विजय हातात असूनही हुकला
कर्णधार चामरी अथापथुने 46 वी, 48 वी आणि 50 वी ओव्हर टाकून आणि दासनायकाने 49 वी ओव्हर टाकून अविश्वसनीय बॉलिंग केली. चामरी अथापथु हिने विशेषतः शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल केली. तिने या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिला आणि 4 विकेट्स घेतल्या. यात एक रन आऊटचाही समावेश होता. या चमत्कारिक कामगिरीमुळे बांगलादेशचा विजय हातात असूनही हुकला आणि श्रीलंकेने मॅच जिंकली.
पाहा अखेरच्या ओव्हरचा ड्रामा - इथे क्लिक करा
दोन धावांच्या अंतराने पाच विकेट्स
दरम्यान, बांगलादेशला विजयासाठी 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता होती. मात्र, बांगलादेशने फक्त दोन धावांच्या अंतराने पाच विकेट्स गमावल्या आणि सामना गमावला. रितू मोनीने डावाच्या 49 व्या ओव्हरमध्ये तीन धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. शेवटचा षटक श्रीलंकेचा कर्णधार चामारी अथापट्टूने टाकला, ज्याने चार विकेट्स घेतल्या.