मला नक्कीच खूप वाईट वाटलं होतं
युवराज सिंगने मारलेल्या सहा सिक्समुळे स्टुअर्ट ब्रॉडच्या करिअरची पुढील 5 ते 6 वर्षे वाचली, असं स्वतः ब्रॉडने म्हटलं आहे. तो म्हणाला की, जर ती घटना घडली नसती, तर मी एक चांगला बॉलर असल्याच्या भ्रमातच क्रिकेट खेळत राहिलो असतो. त्यावेळी मला नक्कीच खूप वाईट वाटलं होतं आणि मी दुःखी होतो, पण त्या सिक्सनी मला माझ्या उणिवांची जाणीव करून दिली आणि अधिक मेहनत घेण्यास प्रवृत्त केलं, असं स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला.
advertisement
600 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा बॉलर
ब्रॉडच्या मते, त्या प्रसंगाने त्याला एक योद्धा बनवलं आणि त्यातून धडा घेत त्याने आपल्या बॉलिंगमध्ये आमूलाग्र बदल केले. याच कारणामुळे तो टेस्ट क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा जगातील महान बॉलर बनू शकलो. एका पराभवातून मिळालेला धडा एखाद्या खेळाडूला यशाच्या शिखरावर कसा नेऊ शकतो, याचं स्टुअर्ट ब्रॉड हे उत्तम उदाहरण दिलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये काय घडलं होतं?
मॅचच्या 17 व्या ओव्हरनंतर युवराज आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यात मैदानात शाब्दिक चकमक झाली. या वादाने युवराज प्रचंड संतापला होता आणि त्याचा सर्व राग पुढच्या ओव्हरमध्ये स्टुअर्ट ब्रॉडवर निघाला. ब्रॉडच्या पहिल्या बॉलवर युवराजने मिडविकेटच्या वरून 111 मीटर लांब सिक्स मारला. त्यानंतर पुढच्या प्रत्येक बॉलवर त्याने सीमारेषेबाहेर हवाई सफर घडवून आणली. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या बॉलवरही त्याने सलग सिक्स मारले.
सर्वात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड
ब्रॉडला काहीच सुचेनासे झाले होते की बॉल कुठे टाकायचा. शेवटच्या बॉलवरही युवराजने कडक सिक्स मारून एकाच ओव्हरमध्ये ६ सिक्स मारण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. त्याने केवळ 12 बॉल्समध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जो आजही क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड मानला जातो. या एका ओव्हरने स्टुअर्ट ब्रॉडच्या करिअरला नवी दिशा दिली, असं त्याने स्वतः मान्य केलं आहे.
