प्रत्येकाला भीती असते, पण...
शुभमन दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे. त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. मी खोटं बोलणार नाही, प्रत्येकाला ही भीती असते. पण ही भीती तुम्हाला प्रेरित करते. त्याची आणि माझ्यातील केमिस्ट्री मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील अद्भुत आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
सूर्याचा वनडेच्या कॅप्टन्सीवर दावा
शुभमन कोणत्या प्रकारचा खेळाडू आणि व्यक्ती आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे मला चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा मिळते, पण मी त्याच्यासाठी आनंदी आहे, असंही सूर्यकुमार यादव मनमोकळेपणाने म्हणाला आहे. यावेळी सूर्याने वनडेच्या कॅप्टन्सीवर देखील दावा केला. मी वनडेचा कॅप्टन देखील होऊ शकलो असतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
मी अजूनही प्रयत्न करेन - सूर्यकुमार यादव
आता मला वाटतं की जर मी एकदिवसीय स्वरूपात चांगली कामगिरी केली असती, जसं सध्या टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सुरू आहे, तर मला एकदिवसीय कर्णधारपदही मिळू शकलं असतं. जर्सीचा रंगही जवळजवळ सारखाच आहे. मी अजूनही प्रयत्न करेन. आता मला वाटतं की जर मी एकदिवसीय स्वरूपात चांगली कामगिरी केली असती, असं म्हणत सूर्यकुमार यादवने शुभमन गिलला धक्का दिलाय.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया टी-ट्वेंटी - सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सैमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर.