सूर्याचा प्रश्नाचा नूर कळाला अन्...
सूर्यकुमार यादव जशास तसं उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहे. सूर्याचा हजरजबाबीपणा हा सर्वांनाच पसंत आला होता. अशातच आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी सूर्याचा हाच अंदाज पहायला मिळाला. सूर्यकुमार यादव याला पत्रकारांना गुगली टाकत हँडशेकवर प्रश्न विचारला. त्यावर सूर्याचा प्रश्नाचा नूर कळाला अन् सूर्याने थेट पत्रकार परिषदेच्या बाहेर सिक्स मारला.'
advertisement
पत्रकार परिषदेत एकच हशा
'सूर्या... तू आणि तुझ्या सहकाऱ्यांनी गेल्या सामन्यात फलंदाजीसह इतर गोष्टीही व्यवस्थित हाताळल्या. हा शिरस्ता रविवारीही सुरू ठेवणार का?' असा प्रश्न भारतीय पत्रकाराने सूर्यकुमारला विचारला. या प्रश्नाचा रोख भारताच्या हस्तांदोलन न करण्याच्या भूमिकेवर होता, पत्रकारांचा हा प्रश्न सूर्यालाही कळला. मात्र यावेळी सूर्यकुमारने प्रश्नास शिताफीने बगल दिली. 'इतर गोष्टी... म्हणजे तुम्ही आमच्या चमकदार गोलंदाजीबद्दल बोलताय ना...' असे पत्रकारालाच विचारत सूर्याकुमारने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकवला.
पाकिस्तानी खेळाडूंसाठी मोटिवेशनल स्पिकर
दरम्यान, भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची टीम इतकी खचली आहे की, आता पाकिस्तानला मोटिवेशनल स्पिकरची गरज पडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी खेळाडूंसाठी मोटिवेशनल स्पिकर पाठवला आहे.