हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून स्टार अमेरिकन फलंदाज आरोन जोन्सन आहे.आरोन जोन्सनवर फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. अमेरिकेचा अव्वल फळीतील फलंदाज जोन्सने १ जून २०२४ रोजी डलास येथे झालेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ च्या पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध अवघ्या ४० चेंडूत नाबाद ९४ धावा काढल्या होत्या. फिक्सिंगच्या आरोपांमुळे बुधवारी (२८ जानेवारी) त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्पुरते निलंबित करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्ट दृष्टिकोनाची तक्रार न केल्याचा आणि कथित गुन्ह्याच्या चौकशीत सहकार्य न केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
advertisement
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, "आयसीसीने युनायटेड स्टेट्स (यूएसए) चा खेळाडू आरोन जोन्सवर क्रिकेट वेस्ट इंडिज (सीडब्ल्यूआय) आणि आयसीसी भ्रष्टाचार विरोधी संहितेचे पाच उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे." हे आरोप प्रामुख्याने २०२३-२४ च्या बीआयएम१० स्पर्धेशी संबंधित आहेत, जे सीडब्ल्यूआय भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या अधिकारक्षेत्रात येतात, तर इतर दोन आरोप आंतरराष्ट्रीय सामन्यांशी संबंधित आहेत, जे आयसीसी कोड अंतर्गत येतात.
आयसीसीच्या म्हणण्यानुसार, जोन्सला तात्पुरते सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे आणि २८ जानेवारी २०२६ पासून १४ दिवसांच्या आत त्याला आरोपांना उत्तर द्यावे लागेल.
न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या ३१ वर्षीय खेळाडूने अमेरिकेसाठी ५२ एकदिवसीय आणि ४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने शेवटचे एप्रिल २०२५ मध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
