टीम इंडियाची ऑलराऊंडर दीप्ती शर्माने 2025च्या वुमेन्स वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात तिने अष्टपैलू कामगिरी केली होती. पहिल्या डावात तिने 58 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. यासह गोलंदाजी करताना 5 विकेट काढून आफ्रिकेचे कंबरडे मोडले होते. यासह दीप्ती शर्माने 2025 च्या वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये 200 हुन अधिक धावा केल्या होत्या आणि 22 विकेट देखील घेतल्या होत्या. याच तिच्या कामगिरीच्या बळावर तिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला होता.
advertisement
विशेष म्हणजे ज्या प्रकारे दीप्ती शर्माने ही कामगिरी केली होती. अशीच कामगिरी युवराज सिंहने 2011 च्या वनडे वर्ल्ड कप दरम्यान केली होती.युवराज सिंहने त्यावेळी आठ सामन्यात 90.50 च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने गोलंदाजीत 15 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यामुळे युवराज सारखी कामगिरी केल्याने दीप्ती शर्माला 'लेडी युवराज' म्हटले जात आहे.
दीप्ती शर्माने 2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 200 हुन अधिक धावा केल्या आणि भारतासाठी 22 विकेट घेतल्या.या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला मालिकावीर पुरस्कार मिळाला आणि सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यासह एलिट यादीत स्थान मिळवले. दीप्तीपूर्वी, 2003 मध्ये सचिन तेंडुलकर, 2011 मध्ये युवराज सिंग आणि 2023 मध्ये विराट कोहली यांनी विश्वचषकात भारताचा मालिकावीर पुरस्कार जिंकला होता. आता, दीप्तीने या दिग्गज नावांमध्ये आपले नाव जोडले आहे.
फायनलमध्ये 5 विकेट घेणारी पहिली गोलंदाज
दीप्ती शर्मा वुमेन्स वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात 5 बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. यापूर्वी कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने ही कामगिरी केलेली नव्हती. अंतिम सामन्यात, दीप्तीने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 बळी घेतले. पुरुष आणि महिला विश्वचषक दोन्हीच्या एकाच हंगामात 200 पेक्षा जास्त धावा आणि 20 पेक्षा जास्त बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.
