पत्रकार परिषदेमध्ये गौतम गंभीरने कोणत्याही आयपीएल टीमच्या मालकाचं नाव घेतलं नाही, पण त्याचा निशाणा दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांच्यावर होता. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 ने गमावली, त्यानंतर पार्थ जिंदाल यांनी वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळा प्रशिक्षक गरजेचा आहे, असं वक्तव्य केलं होतं. पार्थ जिंदाल यांच्या या वक्तव्यावर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला.
advertisement
काय म्हणाला गौतम गंभीर?
'लोक आणि मीडिया विसरले की आम्ही पहिली टेस्ट फक्त 30 रनने हरलो. त्या सामन्यात टीमचा सर्वोत्तम खेळाडू आणि कर्णधार दुखापतीमुळे बॅटिंग करू शकला नाही. अनेक लोक खूप काही बोलत आहेत. काहींनी तर त्यांच्या मर्यादा ओलांडल्या. एका आयपीएल मालकाने वेगवेगळा कोच असावा, असाही सल्ला दिल्ला. मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही मर्यादेत राहून सल्ला द्या', असं गंभीर म्हणाला आहे. गंभीर हा स्वत: पार्थ जिंदाल यांच्या मालकीच्या दिल्लीकडून आयपीएल खेळला होता.
गौतम गंभीर निशाण्यावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये व्हाईट वॉश झाल्यानंतर गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तसंच वनडे सीरिजवेळीही गंभीरचे टीमच्या सीनियर खेळाडूंसोबत मतभेद असल्याची वृत्त समोर आली होती, त्यामुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले आहेत का? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. गंभीरने मात्र या मुद्द्यावर त्याची प्रतिक्रिया दिलेली नाही.
