बीबीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत भारताने कशाप्रकारे विजयानंतर सेलीब्रेशन केलं होतं. याचा संपूर्ण क्षण या व्हिडिओत कैद झाला होता.सुरूवातीला महिला खेळाडू मैदानाच्या दिशेने धावतात.त्यानंतर सपोर्ट स्टाफ सेलीब्रेशन करताना दिसत आहेत. यानंतर भारतीय महिला खेळाडू मैदानात जल्लोष करतात.या दरम्यान खेळाडूंची सपोर्ट स्टाफ सोबत गळाभेट देखील होते. अमोल मुजुमदार एका एका खेळाडूची गळाभेट घेतात. या दरम्यान त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण स्मृती मानधना येताच ते तिची गळाभेट घेतात आणि नंतर तिच्या खांद्यावर डोंक ठेवून रडतात. या दरम्यान स्मृती त्यांना धीर देताना दिसते. दरम्यान ज्यावेळेस ते खांद्यावरून डोकं वर करतात,त्यावेळेस ते रडताना आपला चेहरा लपवतानाही दिसले आहेत.
advertisement
स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरच्या ही डोळ्यात अश्रू होते. दरम्यान मैदानात एकीकडे भारतीय खेळाडू जल्लोष करत होता तर दुसरीकडे साऊथ आफ्रिकेचे खेळाडू निराश होऊन एका बाजूला बसले होते आणि रडत देखील होते. भारतीय खेळाडूंनी हा गोष्ट पाहून साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूंना देखील धीर दिला. भारताची जेमीमा रॉड्रीक्स आणि राधा यादवने यावेळी साऊथ आफ्रिकेची मेरीजन कापची गळाभेट घेऊन तिला धीर दिला होता. या दरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर आणि साऊथ आफ्रिकेची कर्णधार व्होवार्ल्ड यांच्यात देखील गळाभेट आणि चर्चा झाली.
