अर्शदीप आणि जितेशचा ब्रोमान्स
टीम इंडिया पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी सराव करताना दिसत आहे. अशातच टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट बॉलर अर्शदीप सिंग आणि विकेटकीपर जितेश शर्मा यांचा ब्रोमान्स पहायला मिळाला. अर्शदीप सिंग याने जितेशला कडकडून मिठी मारली. त्यावेळी इतर खेळाडू त्याच्याकडे एकटक पाहत असल्याचं दिसतं. टीम इंडिया सराव करत असताना तापमान फक्त 8 डिग्री सेल्शियस होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
टी-ट्वेंटी मालिकेचं वेळापत्रक
दरम्यान, टीम इंडियाचा सीरिजचा पहिला सामना 29 ऑक्टोबरला तर पुढील 4 सामने 31 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरला होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.45 वाजता सुरू होईल. या सामन्यात काही अंशी पावसाची देखील शक्यता आहे.
भारताचा टी-20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग.
