TRENDING:

Rohit Sharma वनडेचं कर्णधारपद सोडावं लागणार? ड्रेसिंग रुममधल्या 'त्या' बातमीने खळबळ

Last Updated:

. रोहित शर्मा मैदानातून बाहेर असल्याने ड्रेसिंग रूममध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत. त्यानुसार ड्रेसिंग रूममध्ये एक नवीन कर्णधार तयार होत आहे. या कर्णधारामुळे रोहित शर्माच कर्णधारपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये काय खिचडी शिजतेय? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma News : टीम इंडियाचा वनडेचा कर्णधार रोहित शर्मा लंडनवरून आता भारतात परतला आहे.सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. रोहित शर्मा मैदानातून बाहेर असल्याने ड्रेसिंग रूममध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत. त्यानुसार ड्रेसिंग रूममध्ये एक नवीन कर्णधार तयार होत आहे. या कर्णधारामुळे रोहित शर्माच कर्णधारपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये काय खिचडी शिजतेय? हे जाणून घेऊयात.
rohit sharma bcci-
rohit sharma bcci-
advertisement

खरं तर इंग्लंड विरूद्धची पाच सामन्यांची टेस्ट मालिका टीम इंडियाने 2-2ने बरोबरीत राखली होती.शुभमन गिलची कर्णधार म्हणून हीप पहिलीच मालिका होती.या मालिकेत गिलच्या नेतृत्वान टीम इंडियाने रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन सारखे अनुभवी खेळाडू नसताना इंग्लंडला कडवी झुंज दिली होती.या दरम्यान टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक नवीन कर्णधार उभरताना दिसला,हा दुसरा तिसरा कुणी नसून शुभमन गिल आहे.

advertisement

शुभमन गिलने या टेस्ट मालिकेतून कर्णधार पदाचा परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवले आहेत.त्यामुळे आता त्याला टीम इंडियापासून दूर ठेवणे अवघड झाले आहे.म्हणून त्याला आशिया कपसाठी टी20 च उप कर्णधार पदही देण्याची चर्चा सूरू आहे.जर या गोष्टीवरही शिक्कामोर्तब झालं तर रोहितकडून वनडेची कॅप्टन्सी हिसकावायला त्याला फार दिवस लागणार आहे.

इंग्लंड विरूद्धच्या कामगिरीनंतर शुभमन गिलने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये मोठी खळबळ माजवली आहे.शुभमन गिल नवा उभरता लीडर म्हणून समोर येताना दिसत आहे.त्यामुळेच त्याच्यावर आशिया कपसाठी उपकर्णधाराची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.या दरम्यान गिलला त्याच्या आयपीएलचा अनुभवही कामी येणार आहे.शुभमन गिल आयपीएलच्या तीन यशस्वी हंगामांनंतर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

advertisement

दरम्यान अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मालिका संपल्यापासून टेस्ट कर्णधार शुभमन गिलला वनडेच कर्णधारपद देण्याबाबत विचार सूरू झाला आहे. सध्या रोहित शर्मा हा वनडेचा कर्णधार आहे. त्याचं आगामी 2027 चा आयसीसीची वर्ल्डकप खेळण्यावर लक्ष्य आहे. पण ज्या प्रमाणे शुभमन गिलच्या अवती भवती ड्रेसिंग रूममध्ये घडामोडी घडतायत.ते पाहता रोहित शर्माचं वनडेच कर्णधारपदही धोक्यात आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma वनडेचं कर्णधारपद सोडावं लागणार? ड्रेसिंग रुममधल्या 'त्या' बातमीने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल