टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल नंतर हर्षित राणा हा एकमेव असा खेळाडू होता जो भारताच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकायचा. विशेष कोणतीही खास कामगिरी केली नसताना त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळायची.यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जायचे.तसेच गंभीरचा लाडका असल्यामुळे हर्षित राणाला संघात स्थान मिळायचे, असे बोलले देखील जायचे. यावर गौतम गंभीर मौन देखील सोडले होते. त्यानंतर आता हर्षित राणाचा टीम इंडियाच्या टेस्ट संघातून पत्ता कट झाला आहे.
advertisement
शमीलाही संघात स्थान नाही
हर्षित राणासोबत सध्या रणजीमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना गार करणाऱ्या मोहम्मद शमीला देखील डच्चू देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मोहम्मद शमीने खतरनाक गोलंदाजी केली होती. शमीने तीन सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये त्याने एकदा विकेटचा पंच उडवला होता. त्याचसोबत मोहम्मद शमीने त्याच्या फिटनेसवरून आणि निवडीवरून देखील निवड समीतीला सुनावलं होतं. त्यात त्याची कामगिरी पाहता त्याला साऊथ आफ्रिकेविरूद्ध संधी मिळेल असे वाटत होते. पण त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही आहे.त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.
ऋषभ पंतची मैदानात वापसी
भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेसाठी पुनरागमन केले आहे. इंग्लंड दौऱ्यात रिषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. क्रिस वोक्स याला यॉर्कर चेंडू खेळताना रिषभच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेत त्याला आराम दिला गेला होता.
टेस्ट मालिकेतील पहिला सामना हा कोलकत्ताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान खेळवला जाणार आहे. दुसरा टेस्ट सामना हा 22 नोव्हेंबर 2025 ला खेळवला जाईल.
साऊथ आफ्रिकेविरूद्ध भारताचा टेस्ट संघ :
शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उप कर्णधार/ विकेटकिपर),यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडीकल, ध्रुव जुरेल, रविंद्र जाडेजा, वॉश्गिंटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप
