न्यूझीलंडविरुद्धचा सामना आवश्यक
सध्या टीम इंडिया 4 पॉईंट्ससह गुणतालिकेत चौथ्या पोझिशनवर आहे, तर न्यूझीलंडचेही 4 पॉईंट्स असून त्यांचा नेट रन रेट (NRR) टीम इंडियापेक्षा कमी आहे. टीम इंडियाचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे आणि हा सामना एक प्रकारे व्हर्च्युअल क्वार्टर फायनल असणार आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडियाचे 6 पॉईंट्स होतील. यानंतरही टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशविरुद्धचा सामनाही जिंकणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही 'जर-तर'च्या समीकरणात अडकावे लागणार नाही.
advertisement
पात्रतेसाठी आणखी एक ट्विस्ट
टीम इंडियाच्या पात्रतेसाठी आणखी एक ट्विस्ट आहे. जर टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवले आणि नंतर बांगलादेशकडून हरली, तर त्यांचे 6 पॉईंट्स होतील. अशा परिस्थितीत न्यूझीलंडने आपला शेवटचा सामना इंग्लंडला हरवून 6 पॉईंट्सपर्यंत मजल मारल्यास, सेमीफायनलमधील प्रवेशाचा निर्णय नेट रन रेटवर (NRR) अवलंबून राहील. सध्या टीम इंडियाचा नेट रन रेट अधिक चांगला असल्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे, पण बांगलादेशविरुद्धच्या पराभवाने एनआरआरला धक्का बसू शकतो.
दोन्ही सामने गमावले तर...
दरम्यान, या सर्व सिनेरिओमध्ये टीम इंडियासाठी सर्वात धोकादायक परिस्थिती म्हणजे दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करणे. जर असे झाले, तर टीम इंडिया केवळ 4 पॉईंट्ससह स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी पुढील दोन्ही सामने 'करो या मरो'चे असणार आहेत. फॅन्सना आशा आहे की टीम इंडिया आपली ताकद दाखवून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करेल.