Google Year in Search 2025 या अहवालानुसार, वैभव सूर्यवंशी हा भारतात सर्वाधिक सर्च (Most Searched) करण्यात आलेला पर्सनॅलिटी ठरला आहे, त्याने इतर बडे क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सलाही मागे टाकले आहे. जगातल्या 'पीपल' (People) कॅटेगरीतही वैभवने सिक्स मारत 6 वं स्थान पटकावलं आहे.
अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने इंडियन प्रीमियर लीग आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून खेळताना IPL मध्ये सर्वात कमी वयाचा शतक करणारा खेळाडू होण्याचा विक्रम केला. एवढंच नाही तर वैभवने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्येही नुकतीच महाराष्ट्राविरुद्ध 108 धावांची खेळी केली आहे.
advertisement
Most Searched Indian Cricketer in Google Year 2025 : वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, अभिषेक शर्मा, शेख रशीद, जेमिमाह रॉड्रिग्ज, आयुष म्हात्रे, स्मृती मानधना, करुण नायर, उर्विल पटेल, विघ्नेश पुथूर.
दरम्यान, युवा खेळाडू प्रियांश आर्या याची देखील यंदाच्या वर्षात चांगलीच चर्चा झाली. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल जिंकवणारी जेमिमाह रॉड्रिग्ज यंदा ट्रेंडिंगमध्ये होती. तर स्मृती मानधना आणि विघ्नेश पुथूर यांनी देखील गुगल गाजवलं आहे.
