13 वर्षीय अयान राज हा बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एका जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात खेळत होता. या सामन्यात त्याने 134 बॉलमध्ये 327 धावांची स्फोटक खेळी केली आहे. 30 ओव्हरच्या या सामन्यात त्याने 22 षटकार आणि 41 चौकार लगावले आहे. राजच्या या खेळीत त्याने 296 धावा फक्त चौकार मारून बनवल्या आहेत.राजने 220.89च्या स्ट्राईक रेटने या धाला केल्या आहेत.
advertisement
राजची ही कामगिरी त्याचा मित्र वैभव सूर्यवंशीच्या इंडियन प्रीमियर लीगमधील चमकदार कामगिरीच्या अवघ्या एका महिन्यानंतर आली. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, वैभवने स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय फलंदाज बनून खळबळ उडवून दिली.त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकून जगभरातील क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित केले.
वैभव सूर्यवंशीला मानतो आदर्श
वैभव आणि मी खूप चांगले मित्र आहोत. मी त्याला माझा आदर्शही मानतो. वैभवची तुलना सध्या क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी केली जाते. राजने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा जेव्हा मी वैभवशी बोलतो तेव्हा मला एक खास अनुभूती येते. आम्ही लहान असताना एकत्र खेळायचो. आज त्याने स्वतःसाठी एक मोठे नाव कमावले आहे आणि मीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे.
इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, राजच्या कुटुंबियांमध्ये क्रिकेटची क्रेझ आहे. त्याचे वडील माझे खेळाडू राहिले आहे. त्याने एकेकाळी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते.आता हे ध्येय त्याच्या मुलाला देण्यात आले आहे. कुटुंबाच्या पाठिंब्याने,अयान राज आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चयी आहे.