वैभव सूर्यवंशीशिवाय प्रियांश आर्या याचीही रायजिंग स्टार आशिया कपसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. जितेश शर्मा इंडिया ए चं नेतृत्व करणार आहे. पुढच्या महिन्यात दोहामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये इंडिया ए ग्रुप बीमध्ये आहे, ज्यात ओमान, युएई आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर ग्रुप ए मध्ये बांगलादेश, हाँगकाँग, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या टीम आहेत.
advertisement
14 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान रायजिंग स्टार आशिया कप ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. इंडिया ए चा पहिला सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे, तर 16 नोव्हेंबरला इंडिया ए आणि पाकिस्तान ए चा सामना होईल. स्पर्धेमध्ये वैभव सूर्यवंशीकडे जगाचं लक्ष असेल, कारण वर्षाच्या सुरूवातीलाच त्याने इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशी आयपीएल इतिहासातला सगळ्यात लहान वयात शतक करणारा खेळाडू ठरला. राजस्थानकडून खेळताना वैभवने गुजरातविरुद्ध 101 रनची खेळी केली होती.
वैभव सूर्यवंशीने ब्रिस्बेनमध्ये अंडर-19 यूथ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्याच महिन्यात शतकही झळकावलं होतं.
रायजिंग स्टार आशिया कपसाठी भारतीय टीम
प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर, सुर्यांश शेडगे, जितेश शर्मा, रमणदीप सिंग, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, विजय कुमार वैश्यक, युधवीर सिंग चरक, अभिषेक पोरेल, सुयश शर्मा
स्टँडबाय खेळाडू
गुरनुर सिंग ब्रार, कुमार कुशाग्रा, तनुष कोटियन, समीर रिझवी, शेख रशीद
