महाराष्ट्राकडून इनिंगची सुरुवात पृथ्वी शॉने केली, पण अर्जुनने सुरूवातीलाच त्याची विकेट घेतली. अर्जुनला या डावात ही एकमेव विकेट मिळाली. पृथ्वी शॉने 5 बॉलचा सामना केला आणि फक्त एक रन काढली. अर्जुनने सामन्यात त्याचा सगळ्यात जवळचा मित्र असलेल्या पृथ्वीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं
अर्जुन-पृथ्वीचं मुंबई कनेक्शन
अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ पूर्वी मुंबईकडून खेळायचे. पण 2022 साली अर्जुनने मुंबई सोडली आणि गोव्याकडून खेळायला सुरुवात केली. दरम्यान, पृथ्वी शॉ गेल्या वर्षी मुंबई सोडून गेला आणि आता तो महाराष्ट्राकडून खेळत आहे. जेव्हा महाराष्ट्र आणि गोवा देशांतर्गत स्पर्धांमध्ये एकमेकांना भेटतात तेव्हा अर्जुन आणि पृथ्वी यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळते.
advertisement
ऋतुराज गायकवाड चमकला
गोव्याविरुद्धच्या सामन्यात ओपनर पृथ्वी शॉ अपयशी ठरला असला तरी महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्फोटक बॅटिंग केली. गायकवाडने 131 बॉलमध्ये 134 रनची खेळी केली, ज्यात सहा सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. गायकवाडच्या उत्कृष्ट बॅटिंगमुळे महाराष्ट्राने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 249 रन केल्या.
