विजय हजारे ट्रॉफीची फायनल विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यात सुरू आहे. या सामन्यात सौराष्ट्रने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर विदर्भाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 317 रन केले. विदर्भाकडून ओपनर अथर्व तायडेने 118 बॉलमध्ये 128 रनची खेळी केली, तर यश राठोडने 54 आणि अमन मोखाडेने 33 रन केले. अथर्व तायडेच्या शतकी खेळीमध्ये 15 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
advertisement
अथर्व ठोठावतोय टीम इंडियाचे दरवाजे
मागच्या काही काळामध्ये अथर्व तायडे बॅटने धमाका केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये दिल्लीविरुद्ध त्याने 62 रन केले होते, तर ग्रुप स्टेजला अथर्वने आसामविरुद्ध 80 आणि बडोद्याविरुद्ध 65 रन केले होते. 2023-24 च्या रणजी ट्रॉफीमध्ये अथर्व तायडेने 10 इनिंगमध्ये 51.44 च्या सरासरीने 463 रन केले होते.
विदर्भाकडून ओपनिंगला खेळत असलेला अथर्व तायडे मागच्या काही काळापासून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे, पण त्याला संधी मिळत नाहीये. मागच्या काही काळामध्ये शुभमन गिलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गिलच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याची टी-20 वर्ल्ड कप टीममध्येही निवड झाली नाही, त्यामुळे भविष्यात अथर्व तायडेला टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
