खरं तर टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडू मैदानात जल्लोष करत होते. या जल्लोषात विराट कोहली अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, जितेश शर्मा अशा अनेक खेळाडूंचा समावेश होता. हे खेळाडू विजयानंतर एक रिल बनवत होते.यामध्ये विराट कोहली आणि अर्शदिप दिसणार होते. या रिलची संपूर्ण कॉन्सेप्ट अर्शदीप सिंहची होती. त्यामुळे अर्शदिप सिंहची होती, त्यामुळे अर्शदीप सिंह त्याला काय बोलायचं कसं बोलायचं आहे? हे शिकवत होता.
advertisement
विशेष म्हणजे ही रिल बनवल्यानंतर व्हायरल करण्यात आली होती. तसेच ही रिल बनवताना त्याच्या मेकींगचाही एक व्हिडिओ बनवला गेला होता.त्यामुळे या व्हिडिओमध्ये ही रिल कशी बनवण्यात आली होती, हे दाखवण्यात आले होते.त्यामुळे या व्हिडिओमध्ये अर्शदीप विराटची शाळा घेताना दिसतो आहे.
किंग कोहलीने रील व्हायरल
अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेक मीम्स शेअर करतो. यावेळी त्याने विराट कोहलीसोबत एक मीम बनवण्याचा प्रयत्न केला, पण किंग कोहलीने रीलमध्ये त्याला असे काही सांगितले ज्यामुळे अर्शदीपच्या अंगलट आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं? पाहा
विराट पाजी, आज रन्स कमी होत्या, नाहीतर आज शतक तर निश्चित होतं, असं अर्शदीप म्हणताना दिसला. त्यावर विराटने काहीही विचार न करता अर्शदीपला रोस्ट केलं.बेटा आज नशिबाने टॉस जिंकलो, नाहीतर दवामुळे तुझंही शतक झालं असतं, अशा शब्दात विराटने अर्शदिपची खिल्ली उडवली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
