आयपीएलचं विजेतेपद केकेआरने पटकावलं, तर सनरायजर्स हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या दोन्ही संघातील खेळाडूंना जी कमाल करता आली नाही ती आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने केलीय. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने सर्वाधिक धावा काढल्या, यामुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. या शर्यतीत सनरायजर्स हैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हेसुद्धा होते. मात्र गेल्या काही सामन्यात दोघांचीही कामगिरी निराशाजनक अशी राहिली. हेडने ५६७ तर अभिषेक शर्माने यंदाच्या हंगामात ४८२ धावा केल्या.
advertisement
पैसा वसूल! होऊ दे खर्च म्हणत गंभीरने घेतला संघात, सुरुवातीला गंडलेल्या स्टार्कने शेवटी केली कमाल
गेल, वॉर्नरनंतर तिसरा असा फलंदाज
विराट कोहलीनंतर यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४ सामन्यात एका शतकासह ५८३ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावलीय. विराटच्या आधी ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनाच अशी कमाल करता आलीय. गेलने २०११ आणि २०१२ मध्ये ऑरेंज कॅप पटकावली होती. तर डेव्हिड वॉर्नरने २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये तीनवेळा एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केलीय.
दोनवेळा ऑरेंज कॅप पटकावणारा पहिला भारतीय
विराट कोहलीने २०१६ मध्ये १६ सामन्यात ९७३ धावा केल्या होत्या. त्यात विराटने ४ शतके आणि ७ अर्धशतके केली होती. विराटच्या नावावर एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही कायम आहे. तसंच दोन वेळा ऑरेंज कॅप पटकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय.