हुबेहुब विराटाच्या लहानपणीसारखा
चिमुकल्याला पाहून विराट स्वतः चकित झाला. तो छोटा मुलगा हुबेहुब विराटाच्या लहानपणीसारखा दिसत होता. विराटला त्या मुलामध्ये आपले बालपण दिसले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य उमटले. मैदानावर सराव आणि ऑटोग्राफ सत्रादरम्यान विराटने अनेक मुलांना ऑटोग्राफ दिलं. त्याच गर्दीत एक छोटा मुलगा उभा होता, ज्याचे रूप आणि डोळे अगदी विराटच्या बालपणीच्या फोटोंशी मिळतंजुळतं होतं. त्याला पाहून विराटची रिअॅक्शन काय होती, यावर चिमुकल्याने स्वत: खुलासा केलाय.
advertisement
काय म्हणाला विराटचा चिमुकला फॅन?
मला विराट कोहलीची स्टाईल आवडते. मी जेव्हा त्यांना हाय म्हणालो, तेव्हा त्यांनी मला म्हटलं की मी थोड्या वेळात येतो. तेव्हा तिथं रोहित शर्मा आणि अजून काही जण होते. तेव्हा विराट भैया रोहितला म्हणाला, ओयय तिकडं बघ माझा डुब्लिकेट बसलाय... छोटा चिकू... असं विराट कोहली म्हणाल्याचं छोट्या चिकूने म्हटलंय. त्यावेळी रोहित शर्मा देखील हसायला लागा. तिथं सगळी लोक मला छोटा चिकू छोटा चिकू म्हणू लागले, असंही चिमुकल्याने म्हटलं.
विराटने मला आपुलकीने विचारलं
दरम्यान, मी तिथं गेल्यावर रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, केएल राहुल आणि विराट कोहलीला भेटलो, असं चिमुकल्याने म्हटलं. विराटने मला आपुलकीने विचारलं याचा मला आनंद झाला, असंही तो म्हणाला. मैदानाबाहेरच्या या भावनिक क्षणानंतर विराटने मैदानात आपल्या बॅटनेही कमाल दाखवली. त्याने अत्यंत संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत 93 धावा केल्या. जरी त्याचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने भारताला 4 गडी राखून विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
