विराट कोहली आपल्याच मस्तीत...
9 मार्च रोजी दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर कोहलीचा हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. विराट सुरुवातीपासूनच आनंदी मूडमध्ये होता. सरावावेळी विराट आपल्याच मस्तीत असल्याचं पुन्हा दिसून आलं. त्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो संघातील सहकाऱ्यांशी संवाद साधत होता, हसत होता आणि विनोद करत होता. त्यामुळे विराट पुन्हा आपल्या अंदाजात मैदानात उतरेल, असं वाटलं होतं.
advertisement
राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी विराटने काय केलं?
सामन्यापूर्वी, राष्ट्रगीत सुरू असताना, विराट कोहली मागे थांबला आणि कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांना संघाचे नेतृत्व करण्यास आणि रांगेत प्रथम उभे राहण्यास सांगितलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विराटने शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना पुढं जायला सांगितलं अन् त्यानंतर विराट तिसऱ्या नंबरवर थांबला. मात्र, यावेळी रोहित शर्मा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर उभा राहिल्याचं दिसलं.
पाहा Video
दोघंही चाळिशीच्या उंबरठ्यावर
दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यानंतर विराट आणि रोहित शर्माच्या वनडे भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या दोघांनी टेस्ट आणि टी२० मधून निवृत्ती स्वीकारली आहे. आधुनिक क्रिकेटमधले हे दोन दिग्गज आता फक्त वनडे प्रकारात खेळत आहेत. दोन वर्षात वनडे वर्ल्डकप होणार आहे. दोघेही चाळिशीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे हे दोघं किती वर्ष भारतासाठी खेळणार याविषयी साशंकता आहे.