TRENDING:

KKR vs GT : विकेट किपरने काढला अजिंक्यचा काटा? हातची मॅच KKR ने 'अशी' गमावली, 12.3 ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 39 व्या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने जीटी विरुद्ध महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. पण त्याच्या विकेटचा थरार पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 39 व्या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने जीटी विरुद्ध महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. केकेआर धावांचा पाठलाग करणाऱ्या सामन्यात तो एकमेव फलंदाज होता ज्याने नियमित अंतराने विकेट पडताना थोडीशी लवचिकता दाखवली.
News18
News18
advertisement

Kolkata Knight Riders : आयपीएलचा 39 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकत पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने कोलकाता समोर 198 धावांचा मोठा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स मात्र अपयशी ठरली. 20 ओव्हरमध्ये कोलकता नाईट रायडर्स 8 गडी बाद 159 धावांवर येऊन थांबले.

advertisement

जॉस बटलरचा व्हिडिओ व्हायरल

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य राहणे सामन्यात बदल घडवू शकत होता. तो त्याचा उत्तम फॉर्ममध्ये खेळत असताना असं काही घडलं ज्याने चाहत्यांना थक्क केलं. कोलकाताची सलामी जोडी रहमानुल्लाह गुरबाज आणि सुनील नरेन सलामीला आले. पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सिराजने गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. त्यांनतर स्ट्राईकवर अजिंक्य राहणे आला आणि त्याने दमदार अर्धशतक झळकावल. राहणेने 36 बॉलमध्ये त्याच अर्धशतक पूर्ण केलं. पण त्यानंतर जे घडलं ते पाहण्यासारखं होत. 12.2 बॉल मध्ये अजिंक्यने अर्धशतक केलं आणि 12.3 वॉशिंग्टन सुंदरने 'ऑफ स्टंपच्या बाहेर' बॉल टाकत रहाणेला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. या दरम्यान जॉस बटलरने सेकंदही न गमावता विजेचा वेगाने स्टम्पिंग करत गुजरातला हा मोठा विकेट मिळवून दिला.

advertisement

KKR vs GT : या दोन्ही संघाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या 12 गुणांसह गुजरात टायटन्स खेळावर आणि पॉइंट्स टेबलवर वर्चस्व गाजवत आहे. तर 6 गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स पॉइंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सला या शर्यतीत टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पुढच्या सामन्यात त्यांना प्लेऑफसाठी कॉलिफाय करायचं असेल तर एकही सामना न गमावता खेळात टिकून राहावं लागणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs GT : विकेट किपरने काढला अजिंक्यचा काटा? हातची मॅच KKR ने 'अशी' गमावली, 12.3 ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल