वेस्ट इंडिजचा अजब निर्णय
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने खेळपट्टी पाहून स्पिन बॉलिंगवर विश्वास ठेवला. 50 ओव्हरच्या या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या ओव्हरपासून स्पिन बॉलिंगने सुरूवात केली आणि 50व्या म्हणजेच शेवटच्या ओव्हरपर्यंत स्पिनरनेच बॉलिंग केली. वेस्ट इंडिजने या सामन्यात एकूण 5 बॉलरचा उपयोग केला आणि हे पाचही बॉलर स्पिनर होते. म्हणजेच वेस्ट इंडिजने 50 पैकी 50 ओव्हर स्पिन बॉलिंग केली.
advertisement
भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यानेही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्व 50 ओव्हर स्पिनरनी टाकल्या, हे पाहून मला आश्चर्य वाटले. असं याआधी कधी झालं होतं का? असा प्रश्न दिनेश कार्तिकने विचारला आहे. वनडे सामन्यात सर्व 50 ओव्हर स्पिन बॉलिंग करून घेणारी वेस्ट इंडिज ही पहिलीच टीम ठरली आहे. याआधी वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी घटना कधीच घडली नव्हती. याआधी वनडे क्रिकेटमध्ये स्पिनर्सनी सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने 44 ओव्हर स्पिन बॉलिंग टाकली होती, जे त्यांनी 3 वेळा केलं होतं. 1996 साली वेस्ट इंडिजविरुद्ध, 1998 साली न्यूझीलंडविरुद्ध आणि 2004 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेच्या स्पिनर्सनी 44 ओव्हर टाकल्या.
बांगलादेशला 213 रनवर रोखलं
वेस्ट इंडिजच्या स्पिनर्सनी त्यांच्या कॅप्टनचा हा निर्णय योग्य ठरवला आणि बांगलादेशला 50 ओव्हरमध्ये 213/7 वर रोखलं. अकील हुसैन, रोस्टन चेस, खारी पियरे, गुडाकेश मोती आणि एलिक अथनाजे यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली. गुडाकेश मोतीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अकील हुसैन आणि एलिक अथनाजे यांना 2-2 विकेट मिळाल्या. रोस्टन चेस आणि खारी पियरे यांना एकही विकेट मिळाली नाही, पण दोघांनीही टिच्चून बॉलिंग केली.