पुण्यात जन्म, आता टीम इंडिया
क्रिकेटर हर्ष दुबे हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक युवा आणि आश्वासक ऑल-राऊंडर खेळाडू आहे. त्याचा जन्म 23 जुलै 2002 रोजी आपल्या पुण्यात झाला. हर्ष दुबे लेफ्टी बॅटर असून तो लेफ्टी स्लो ऑर्थोडॉक्स बॉलिंग देखील करतो. ज्यामुळे तो सध्या इंडिया ए संघासाठी एक मौल्यवान खेळाडू आहे. हर्ष दुबे हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचं प्रतिनिधित्व करतो.
advertisement
फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हर्षच नाव झाल्यावर त्याला नवी ओळख मिळाली. त्यानंतर 2025 च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला एका जखमी खेळाडूच्या जागी संघात घेतलं अन् तिथून त्याचा टीम इंडियापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सुरू झाला. 28 फेब्रुवारी 2021 रोजी विदर्भकडून लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने टी20 आणि फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा 2024-25 चा रणजी ट्रॉफी हंगाम ठरला. या हंगामात त्यांनी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
इंडिया-ए संघात संधी
हर्ष दुबेने एकाच रणजी हंगामात तब्बल 69 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधलं आणि विदर्भ संघाला रणजी करंडक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही मिळाला. रणजी ट्रॉफीमधील विक्रमी कामगिरीमुळे त्यांची निवड इंडिया-ए संघातही झाली आहे.
टीम इंडियाचा आश्वासक ऑलराऊंडर
दरम्यान, हर्ष दुबे हा भारतीय क्रिकेटमधील एक आश्वासक ऑलराऊंडर मानला जात असून, त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीमुळे तो भविष्यात भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळू शकतील अशी अपेक्षा आहे.
