याच पार्श्वभूमीवर IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना युवा फलंदाज अभिषेक शर्मानं केलेली वादळी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानंही या खेळीवर मोठं वक्तव्य केले आहे.
अभिषेक शर्मानं सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीचा झंझावात सुरू केला. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत त्यानं RR च्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याच्या याच शैलीवर प्रभावित होऊन वॉन म्हणाला की, आगामी काळात रोहित शर्माच्या जागी टीम इंडियाचं नेतृत्व अभिषेक शर्मा करू शकतो.
advertisement
वॉननं रोहित आणि अभिषेक यांच्यातील फलंदाजी शैलीची तुलना करताना म्हटलं की, ज्याप्रमाणे रोहितकडे चेंडू हिट करण्याचं नैसर्गिक कौशल्य आहे. तसेच टॅलेंट अभिषेकमध्येही दिसते. वॉनचे हे वक्तव्य आता भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.
IPL मध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला आता ‘भविष्याचा स्टार’ म्हणून ओळख मिळू लागली आहे. मात्र तो ही कामगिरी सातत्याने करत राहतो का आणि भारतीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळवतो का, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे .
दुसरीकडे, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांचं अर्धशतक व्यर्थ गेले. राजस्थानला 242 धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने रविवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या IPL 2025 च्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 44 धावांनी दणदणीत विजय मिळवला.