बटने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया हा वेगळा संघ असल्याचे दिसून आले. त्यांनी भारतीय संघाला श्वास घेऊ दिला नाही. अंतिम फेरीतील त्याचे मैदान वेगळे होते.' पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटपटू म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गोलंदाजी करताना चेंडूचा वेग सतत बदलला. त्यांना नियमित विकेट मिळत राहिल्या आणि जुन्या चेंडूवर संघाने फार कमी धावा दिल्या.
advertisement
तो म्हणाला की, नाणेफेकीमुळे भारताने थोडे धैर्य गमावले. मात्र, सुरुवात चांगली झाली आणि रोहित शर्मा आऊट क्लास खेळला. माझ्या मते त्यांच्याकडून चूक होत आहे, ती म्हणजे वर्ल्ड कप फायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये तुम्ही 'पार स्कोअर' पकडला पाहिजे. जेव्हा तुम्ही हा स्कोअर साध्य करता तेव्हा 'किक ऑन' करा. ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजी केली. रोहित आणि विराट 25 षटके बाकी असताना दोघेही बाद झाले अशी परिस्थिती भारताने कधीच पाहिली नव्हती. अशी परिस्थिती या सामन्यात आली. या सामन्यात रोहित शर्माने स्वतःची विकेट ऑस्ट्रेलियाला दिली तर विराट कोहली दुर्दैवी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान भारतीय फिरकीपटूंच्या षटकांमध्ये स्लिप न ठेवण्याच्या कर्णधार रोहित शर्माच्या रणनीतीवरही त्याने प्रश्न उपस्थित केले.
वाचा - वर्ल्ड कप संपताच अय्यरचा साखरपुडा.... कोण आहे अय्यरची होणारी बायको?
बट म्हणाला, मला वाटते सूर्यकुमार यादवने फारशी जबाबदारी घेतली नाही. सूर्यकुमार काय करतोय हे मला समजले नाही. तो जेव्हा टेलंडर्ससोबत फलंदाजी करत होता, तेव्हा त्याने स्वतः जास्त चेंडू खेळायला हवे होते. पण मोठे फटके खेळण्याऐवजी तो एकेरी नॉन स्ट्रायकर एंडला जात राहिला. कोहली आऊट झाल्यानंतर भारताला कुठूनही सावरता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान पहिल्या 10-15 षटकांमध्ये भारताला स्विंग मिळाले. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तीन गडी बाद झाल्यानंतर भारताला जास्त वेळ विकेट मिळाल्या नाहीत. दव आल्यानंतर फलंदाजी करणे सोपे झाले. रोहित हा सहसा आक्रमक कर्णधार असतो, पण त्याने फिरकीपटूंविरुद्ध स्लिप्स ठेवल्या नाहीत. 240 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी तुम्हाला विकेट्सच घ्याव्या लागणार होत्या. अशात रोहितने स्लिप का घेतली नाही हे समजू शकले नाही? वास्तविक त्या सामन्यात विकेट घेण्याशिवाय विजयासाठी दुसरा मार्ग नव्हता.