एक तास सराव आणि टायमिंगवर लक्ष
अॅडलेडमध्ये दोन्ही वरिष्ठ फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. रोहित आणि विराटने नेट प्रॅक्टिसमध्ये खूप मेहनत घेतली. कर्णधार रोहितने सुमारे एक तास फलंदाजी केली, त्याच्या स्ट्रोक प्ले आणि टायमिंगवर लक्ष केंद्रित केलं. त्याआधी रोहित शर्माने यशस्वी जयस्वाल याच्याकडून बॅट घेतल्याचं पहायला मिळालं. रोहित शर्मा यशस्वी जयस्वालच्या बॅटने सराव करतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
रोहित शर्माला वाटेत जयस्वाल भेटला अन्...
प्रदीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतलेला कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना पर्थमध्ये अपेक्षेनुसार खेळता आले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे संघाला विजय मिळवता आला नाही. एका व्हिडिओमध्ये यशस्वी जयस्वाल फलंदाजीचा सराव करण्यासाठी दोन बॅट घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. वाटेत तो रोहित शर्माला भेटतो. दोघे गप्पा मारतात. दरम्यान, रोहित यशस्वी जयस्वालची एक बॅट घेऊन सावलीचा सराव सुरू केला. जयस्वालची बॅट रोहितच्या तुलनेत हलकी असल्याने त्याने यशस्वीची बॅट घेतल्याचं बोललं जातंय.
Rohit Sharma checking Jaiswal's bat. pic.twitter.com/tQbTrcRz8x
—