न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध सामना जिंकला तर...
श्रीलंका आणि पाकिस्तानवर सलग विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केल्यानंतर, भारताला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध सामना गमावला आणि दुसरीकडे न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध सामना जिंकला तर दोन्ही संघाचे 6 पाईंट्स होतील. नेट रननेट देखील मोठा फरक नाही. तरीही टीम इंडियाला क्वालिफाय म्हणून आयसीसीने घोषित का केलं?
advertisement
विजयांच्या संख्येच्या आधारे सेमीफायनलमध्ये तिकीट
विजयानंतर भारताने तीन विजयांसह सहा गुण मिळवले. न्यूझीलंड आणि बांगलादेश हे दोघंही त्यांच्या अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवून सहा गुण मिळवू शकतात. पण जरी भारताने बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना गमावला तरी, ते विजयांच्या संख्येच्या आधारे सेमीफायनलमध्ये जातील. टीम इंडियाने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 6 पैकी 1 च सामना जिंकलाय. दोन सामने त्यांचे ड्रॉ झाले होते. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये गुणांच्या बरोबरीसह समाप्त होणाऱ्या संघांसाठी हा प्राथमिक टायब्रेकर असेल. पण त्यासाठी न्यूझीलंडला आगामी सामना जिंकावा लागेल.
सेमीफायनलमध्ये कोण कोण?
दरम्यान, स्पर्धेत एकमेव अपराजित संघ असलेला ऑस्ट्रेलिया सहा सामन्यांतून 11 पाईंट्स आठ संघांच्या पाईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका संघ पात्रता फेरी गाठणारा दुसरा संघ ठरला, सध्या त्यांच्याकडे एक सामना शिल्लक असताना 10 गुण आहेत. तर चार वेळा विजेता इंग्लंड हा भारतावर झालेल्या विजयानंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला होता.
