TRENDING:

2026 ची आयपीएल MS Dhoni खेळणार की नाही? रिटेंन्शनच्या 10 दिवस आधीच CSK च्या सीईओंनी स्पष्ट सांगितलं

Last Updated:

प्रत्येक हंगामात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2026 चा हंगाम खेळणार का? या प्रश्नांवर आता खेळाडू रिटेन करण्याआधाची चेन्नईच्या सीईओंनी उत्तर देऊन टाकले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026, Ms Dhoni : आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला अजून खूप अवकाश आहे.तत्पुर्वी आयपीएलचे सर्व संघ खेळाडूंना रिटेंन्शन, ट्रेडींग आणि रिलीज करत आहेत.त्यामुळे संघाची जुळवाजुळव करण्यासाठी आतापासून सुरूवात झाली आहे. या सर्वात प्रत्येक हंगामात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2026 चा हंगाम खेळणार का? या प्रश्नांवर आता खेळाडू रिटेन करण्याआधाची चेन्नईच्या सीईओंनी उत्तर देऊन टाकले आहे.त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ms dhoni
ms dhoni
advertisement

चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू आहे. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.परंतु असे असूनही, तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहिला. धोनी तेव्हापासून आयपीएल खेळत आहे.यामुळे धोनी पुढील हंगामात खेळेल का?असा प्रश्न उपस्थित होतो.दरम्यान,चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी यावर स्पष्टच सांगितलं आहे की धोनी पुढील वर्षी निवृत्त होणार नाही, आणि 2026 चा आयपीएल हंगाम खेळेल.

advertisement

धोनी निवृत्ती घेणार का?

काशी विश्वनाथ यांनी प्रोव्होक लाइफस्टाइलशी बोलताना धोनीबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. धोनी निवृत्त होणार नाही.तसेच त्यांना पु्न्हा विचारले असता, "तो कधी निवृत्त होईल?" यावर मी त्याला तुमच्याशी बोलायला सांगेन,असे उत्तर त्यांनी दिले.

काशी यांना पुढे विचारले गेले की चेन्नई सुपर किंग्ज संघ पुढच्या वर्षी पुन्हा जेतेपद जिंकेल का. त्यांनी उत्तर दिले, "आम्ही तयार आहोत, पण आम्हाला माहित नाही की आम्ही खेळू. पण आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न करू. दरम्यान 2025 च्या आवृत्तीत, चेन्नईने त्यांच्या 14लीग सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकले आणि पॉइंट टेबलमध्ये शेवटचे स्थान पटकावले.

advertisement

चेन्नईचा संघ बदलणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 1 लाख 25 हजार दिवे, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळले दगडूशेठ गणपती मंदिर
सर्व पहा

चेन्नई सुपर किंग्ज 2026 च्या आयपीएल हंगामापूर्वी महत्त्वपूर्ण बदल करू शकते. चेन्नईने आर. अश्विनला 9 कोटी मध्ये विकत घेतले, परंतु अश्विनने आता आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. संघ डेव्हॉन कॉनवे, दीपक हुडा आणि विजय शंकर यांच्यासोबतही वेगळे होऊ शकतो.यासोबत त्यांच्या संघात कोण नवीन खेळाडू सामील होणार आहे असे विचारले असता, काशी म्हणाले, "लिलाव नोंदणीपत्रक आल्यावरच आम्ही तुम्हाला सांगू शकू, जे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात असू शकते."

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
2026 ची आयपीएल MS Dhoni खेळणार की नाही? रिटेंन्शनच्या 10 दिवस आधीच CSK च्या सीईओंनी स्पष्ट सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल