अभिषेक नायर याची केकेआरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक नायर केकेआरचा प्रशिक्षक झाल्यामुळे आता तो रोहितलाही केकेआरच्या टीममध्ये घेऊन येईल, असं बोललं जात आहे. आयपीएल 2026 साठीचा लिलाव 15 डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे, त्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रॅन्चायजींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे, असं वृत्तही समोर आलं आहे.
advertisement
रोहित शर्मा केकेआरकडून खेळणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच मुंबई इंडियन्सने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. 'सूर्य उद्या पुन्हा उगवेल, हे निश्चित आहे. पण (नाईट) कडे, हे कठीण नाही, तर अशक्य आहे', असं कॅप्शन मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या फोटोला दिलं आहे. या पोस्टसोबतच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माबद्दल सुरू असलेल्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला, त्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर यावर्षी इंग्लंड दौऱ्याच्या आधी रोहितने टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रोहितला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढण्यात आलं, त्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? याबाबत प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी थेट उत्तर देणं टाळलं.
