तुमच्यासोबत रोहित शर्मा होता म्हणून...
टीम इंडियाने आज वर्ल्ड कप जिंकला. त्याचं कारण तुम्हाला माहितीये का? त्याला कारण तुम्ही आहात. तुमच्या प्रत्येकामुळे टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली आहे. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तुम्ही संघाच्या मागे खंबीरपणे उभं पाहिलात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास होता. इंडियाच्या रस्त्यावर अनेक लोकं उभा होती. आज तुमच्यासोबत सचिन तेंडूलकर, तुमच्यासोबत रोहित शर्मा होता म्हणून तुम्हाला विजय मिळवता आला. पण साऊथ अफ्रिकन टीमला पाठिंबा देण्यासाठी साऊथ अफ्रिकेचे खेळाडू कुठं होते? असा सवाल या महिलेने उपस्थित केला आहे.
advertisement
साऊथ अफ्रिकेचे क्रिडामंत्री कुठं होते?
साऊथ अफ्रिकेचे खेळाडू यावेळी कुठं होते? साऊथ अफ्रिकेचे क्रिडामंत्री कुठं होते? भारतातील लोक याचा विचार करतात, त्यामुळे ते समर्थन देण्यासाठी येतात. त्यामुळे टीम इंडिया टॉपवर असते. स्मृती मानधना आणि पोरींना खूप मेहनत घेतली. त्यांनी प्रत्येक वेळी जीव लावून खेळण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या पोरींना सुपूर्ती कुठून मिळणार? साऊथ अफ्रिकेच्या पोरींना खेळताना कसं वाटत असेल. त्यांना अखेरीस वाटलं असेल आता आपण हरलो, असं ही महिला फॅन म्हणताना दिसतीये.
साऊथ अफ्रिकेला त्यांच्या संघाची काळजी नाही
साऊथ अफ्रिकन महिलांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी चांगली झुंज दिली. पण त्या हरल्या कुठं तर टीम इंडियाच्या फॅन्सचा संघाला सपोर्ट होता. त्याचे हिरो त्या क्राऊडमध्ये उपस्थित होते. रोहित शर्माला पाहून नक्कीच खेळाडूंना जोश आला असेल. सचिनसोबत हात मिळवणी केल्यानंतर त्यांची उर्जा आणखी वाढली असेल. सर्वजण म्हणतात की, साऊथ अफ्रिकेला त्यांची संघाची काळजी नाही. आज मला एका मिनिटासाठी हे खरं वाटलं, असा आरोप देखील तिने यावेळी केला.
पाहा Video
दरम्यान, भारतावाले खेळ जगतात आणि खेळासाठी श्वास घेतात, असंही ही महिला म्हणाला दिसतीये. भारताच्या वुमेन्स संघाने वर्ल्ड कप का जिंकला? माहितीय़े का? कारण तुम्ही ते डिजर्व करता, असं ही साऊथ अफ्रिकन फॅन महिला म्हणताना दिसतीये.
